Posted inशेती तंत्र
मृगबहारातील केळी लागवड
क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.…
कडधान्य पिकांच्या मुळावर सूक्ष्म जिवाणूच्या गाठीमुळे हवेतील नत्र शोषून जमिनीत स्थिर केले जातो व जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते. या पिकांची मुळे खोलवर पसरून खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून ते वरच्या थरात उपलब्ध स्थितीत आणून सोडतात. ही पिके जमिनीवर पसरलेल्या स्थितीत वाढून जमीन जास्तीत जास्त झाकतात. त्यामुळे जमिनीची धूप होण्यापासून संरक्षण होते. या सर्व घटकांव्यतिरिक्त कडधान्य पिकांचे उत्पादनही मिळते आणि जमिनीची सुपीकता व उत्पादकतादेखील वाढते. मानव, पशुधन व जमिनीच्या आरोग्यासाठी कडधान्य पिकांच्या लागवडीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.