द्राक्ष पिकावर कमी-जास्त तापमानाचा मोठा परिणाम होत असतो. द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी तापमानातील फरक लक्षात घेऊन पिकाची काळजी घेणे आवश्यक असते. सध्याचा काळ द्राक्षांच्या घडवाढीचा असून, या दिवसांत ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षबागेची निगा राखणे गरजेचे आहे.