कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची केंद्रीय मंत्र्यांकडून अपेक्षा
Onion export duty withdrawal demand by farmers शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाच्या हॉलमध्ये प्रधानमंत्री स्वामीत्व कार्ड वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
त्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री स्वतः नाशिकमध्ये येत आहेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून (kanda utpadak shetkari sanghatana) वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या दौऱ्याचे स्वागत करण्यात येत आहे परंतु नाशिक आगमनापूर्वी वाणिज्य मंत्री गोयल यांनी कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क (onion export duty) पूर्ण हटवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक आठवड्याला कांद्याच्या (onion market price) दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत असून नाशिकसह राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये खरीप व लेट खरीपच्या लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
कांदा निर्यातशुल्क (onion export duty) हटविणे का गरजेचे?
शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये आता अवघा हजार बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका निच्चांकी दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्किल झाले आहे. उलट शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे घालून मजुरी, वाहनाचे भाडे देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक( kanda bajarbhav) वाढल्याने सध्या देशात कुठेही कांद्याची टंचाई नाही असे असताना शेतकऱ्यांना आपल्या कांद्याच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ कांद्यावरील 20% निर्यात शुल्क कमी करावे यासाठी कांदा संघटनेकडून महाराष्ट्रातील खासदारांकडे लेखी पत्र देत दिल्लीतील अधिवेशनात तसेच आमदारांना लेखी पत्र देत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचे मागणी करण्यासाठी बाजू मांडण्याची विनंती करण्यात आली होती, असे श्री. दिघोळे यांनी म्हटले आहे.
देशातील सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यात वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे आगमन होत आहे त्याबद्दल त्यांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करू. परंतु मंत्री गोयल यांनी कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे.