Onion crop damaged देवळा येथील विठेवाडी गावच्या शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे तणनाशकाने नुकसान झाल्यानंतर आता पुन्हा सुमारे शंभरावर एकर कांद्याचे तणनाशकाने नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, मालेगाव, बागलाण, सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कांदा पिकात IPL कंपनीने clogold तणनाशक फवारणी केल्यानंतर शेकडो शेतकऱ्यांचा कांदा शेतातच संपूर्ण जळून गेले.
त्यामुळे या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज सोमवारी महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटेनने अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रती एकरी दीड लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली.
यावेळी उपस्थित निवाने तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकरीही उपस्थित होते. दरम्यान शेतकऱ्यांनी कांद्यावर तणनाशक फवारताना काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.