शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन – कर्जमाफी व व्याजसूट यासाठी लढा

NDCC Bank: व्याज माफ करा, अन्यथा कर्जफेड न करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

“बँकेने शेतकऱ्यांना संपूर्ण व्याजमाफी (Full Interest Waiver) देऊन मूळ मुद्दलाचे दहा हप्ते (Loan Restructuring in 10 Installments) करून द्यावेत,” अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली असून, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन (Farmer Protest in Nashik) उभारण्यात आले आहे. बँकेकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली (Forced Loan Recovery) तात्काळ थांबवावी आणि कोणत्याही शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर (7/12 Extract) बँकेचे किंवा संस्थेचे नाव नमूद करू नये, अशी मागणी आंदोलन समितीने केली आहे.

या पार्श्वभूमीवर आज दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक (High-level Meeting) पार पडली. या बैठकीस बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक (Banking Expert) संजय मालकर (अकोला) आणि धनवान भारत पार्टीचे अध्यक्ष (Political Leader) सुरेश परब (मुंबई) यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की, “आपल्या ठेवी बँकेत (Fixed Deposits in Bank) ठेवा, जेणेकरून बँक उर्जित स्थितीत येईल.”

या बैठकीस सहकार सचिव संतोष पाटील, बँकेचे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण, विभागीय सहनिबंधक फयाज मुलाणी, जिल्हा उपनिबंधक, शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे, आदिवासी सहकारी संस्थेचे अध्यक्ष कैलास बोरसे, दिलीप पाटील, अर्जुन तात्या बोराडे, प्रकाश शिंदे, रामराव मोरे, विलास बोरस्ते, आनंदराव चौधरी, दगाची अहिरे, भाऊसाहेब सोनवणे, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते आणि सुधाकर मोगल यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या:

– संपूर्ण कर्जमाफी (Complete Loan Waiver)
– संपूर्ण व्याज माफ करणे (Interest Waiver)
– मूळ मुद्दलाचे दहा ते पंधरा हप्ते (Installment-based Repayment)
– सातबारा उताऱ्यावर बँकेचे व संस्थेचे नावे लावू नयेत (No Bank Names on 7/12 Extract)
– विविध कार्यकारी सहकारी संस्थांवर प्रशासक नेमू नये (No Administrator on Co-operative Societies)

या बैठकीत भगवान बोराडे यांनी स्पष्ट सांगितले की, “बँकेने जर कारवाई थांबवून मुद्दलाचे हप्ते केले, तरच शेतकरी विश्वासाने हप्ते भरण्यास सुरुवात करतील.” कैलास बोरसे यांनीही सर्व मागण्या पुन्हा अधोरेखित केल्या.

बैठकीच्या शेवटी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी सर्व शेतकरी नेते, बँक अधिकारी, संतोष पाटील आणि विद्याधर अनास्कर यांचे विशेष आभार

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *