manmohan singh

Manmohan Singh: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असलेले पंतप्रधान ( Manmohan Singh)

Manmohan Singh former PM of India had passes away शेतकरी आणि सामान्याप्रती संवेदशील असलेले देशाचे माजी पंतप्रधान व जागतिक किर्तीचे अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंग यांचे काल दिनांक २६ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. शुद्ध हरपल्याने त्यांना रात्री ८ च्या सुमारास नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तथापि उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत रात्री १० च्या सुमारास मालवली असे एम्सच्या अधिकृत बुलेटिनने म्हटले आहे.

दरम्यान त्यांच्या जाण्याने देशभरात शोकाचे वातावरण असून त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या निधनाने देशाचं सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्वं हरपलं आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी पंतप्रधान आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील, अशा प्रतिक्रिया जगभरातून येत आहेत.

जागतिकीकरणाचे जनक डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh)

देशाच्या जागतिकीकरण आणि आर्थिक सुधारणांचे जनक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भातील परिस्थिती लक्षात घेऊन २००५ च्या सुमारास आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी म्हणजेच ७२ हजार कोटी रुपयांची केली होती. त्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जागतिकीकरणाच्या निर्णयामुळे भारतीय कृषी क्षेत्रातला जगाची कवाडे मोकळी झालीत आणि कृषी मालाच्या निर्यातीसोबतच आधुनिक बियाणे, तंत्रज्ञान यांचा लाभ देशातील शेतकऱ्यांना घेता आला.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले.

भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहन सिंह यांनी रचला अशा प्रतिक्रिया राजकीय, सामाजिक, उद्योग जगातातून येत आहेत.

यशस्वी अर्थमंत्री आणि पंतप्रधान Dr. Manmohan Singh

गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचं बहुतांश श्रेय डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे काम केलं. जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास, दूरदष्टीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास या बळावर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून रुळावर आणली. अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत केला. मजबूत अर्थव्यवस्थेचा उपयोग समाजाला होईल याची काळजी घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेला आज जे मजबूत स्वरुप प्राप्त झाले आहे, त्याचं मोठं श्रेय डॉ. मनमोहन सिंह यांना आहे.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *