Maharashtra Weather: महाराष्ट्रात वातावरण बदलतेय, कशी असणार थंडी

Maharashtra Weather: महाराष्ट्रात वातावरण बदलतेय, कशी असणार थंडी

Maharashtra weather update: गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत असलेल्या ऊबदार वातावरणात बदल होवून, आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार दि. ९ जानेवारी पर्यन्त किमान तापमानात काहीशी घट होवून संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू मध्यम थंडी जाणवेल, असा अंदाज  हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

त्यापुढील म्हणजे १० ते १६ जानेवारी दरम्यानच्या दुसऱ्या आठवड्यातही खान्देश नाशिक नगर पुणे सातारा तसेच रत्नागिरी छ.सं.नगर ९ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील  २७ जिल्ह्यात थंडीचा प्रभाव तसाच टिकून राहून पहाटेचे किमान तापमान हे सरासरीच्या खाली जाणवेल असे वाटते. त्यातही उत्तर विदर्भात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता जाणवते.

परंतु वर ९ जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतकेच म्हणजे १२ ते १४ डिग्री से. ग्रेड इतके जाणवण्याची शक्यता आहे, असे वाटते.

पुढील १५ दिवस म्हणजे गुरुवार दि. १६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. नंतर मात्र थंडी वा पावसाची स्थिती ही मात्र एमजेओ च्या तीव्रतेवरच अवलंबून असेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *