Maharashtra Cabinate: नागपूरला झाला मंत्रिमंडळ विस्तार

Maharashtra Cabinate: नागपूरला झाला मंत्रिमंडळ विस्तार

Maharashtra Cabinate expansion and oath taking ceremony in Nagpur  महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा शपथविधी आज दिनांक १५ डिसेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्व संध्येला पार पडला. त्यात भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाच्या सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या आता ४२ इतकी झाली आहे.

भाजपासह यंदा सर्वच पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली, तर काही जुनेजाणते नेते पुन्हा मंत्रीपदी विराजमान झाले आहेत. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, अब्दुल सत्तार यांच्यासारख्या काही मंत्र्यांना या विस्तारात वगळले आहे.

या मंत्रिमंडळात ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी तर ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

आज या मंत्र्यांनी घेतली शपथ

भाजपा
चंद्रकांत पाटील
मंगलप्रभात लोढा
राधाकृष्ण विखे पाटील
पंकजा मुंडे
गिरीश महाजन
गणेश नाईक
चंद्रशेखर बावनकुळे
आशिष शेलार
अतुल सावे
संजय सावकारे
अशोक उईके
आकाश फुंडकर
माधुरी मिसाळ
जयकुमार गोरे
मेघना बोर्डीकर
पंकज भोयर
शिवेंद्रराजे भोसले
नितेश राणे
जयकुमार रावल

शिवसेना
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
उदय सांमत
शंभूराज देसाई
प्रताप सरनाईक
योगेश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
संजय शिरसाट

राष्ट्रवादी काँग्रेस
हसन मुश्रीफ
आदिती तटकरे
धनंजय मुंडे
दत्तमामा भरणे
बाबासाहेब पाटील
नरहरी झिरवाळ
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक
माणिकराव कोकाटे

शपथविधीचा सभारंभ Cabinate Oath ceremony

 

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *