Ladaki Bahin yojna

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे पैसे आले नाही तर काय करावे?

Ladki bahin yojana मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कोट्यवधी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या पैशांची प्रतीक्षा होती. मध्यंतरी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आल्यावर लाडकी बहिण योजनेचे पैसे डिसेंबरमध्येच मिळतील अशी अपेक्षा होती. त्यानंतर आता मंगळवार दिनांक २३ डिसेंबर पासून लाडकी बहिण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरूवात झाली आहे.

बुधवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सुटी असल्याने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबरपासून उरलेल्या महिलांच्या खात्यावर पुन्हा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा होईल.

kanda bajarbhav today: कांदा दराबाबत मोठी बातमी; लासलगावमध्ये कांदा दर स्थिरावले

लाडकी बहिण योजनेचे पैसे आले नाही तर काय करावे ( Ladki Bahin yojana)

लाडकी बहिण योजनेचे पैसे जर तुमच्या खात्यावर जमा झाले नसेल, तर पुढील प्रक्रिया तातडीने करा
१. तुमचे बँक खाते किंवा बँक अकाऊंट हे बंद पडले असेल, तर सर्व प्रथम ते सुरू करून घ्या.
२. त्यानंतरही पैसे आले नाहीत गावातील ग्रामपंचायतीकडे किंवा शहरी भागात जवळच्या महापालिका कार्यालयात संपर्क साधावा.
३. तुम्ही १८१ या हेल्प लाईनवर फोन करू तक्रार करू शकता
४. जवळच्या सीसीसी केंद्राचीही मदत घेता येईल.

लाडकी बहीण योजना वय किती असावे?

लाडकी बहिण योजनेच (Ladki bahin yojana) पात्रता काय आहे, किती वयाच्या महिलांना ही योजना लागू होते ते जाणून घेऊ.
१. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
२. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
३. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
४.. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

Maharashtra Rain warning: राज्यात गारपीट आणि पाऊस; नाशिकसाठी असा आहे इशारा

लाडकी बहीण योजना कागदपत्र काय लागतात?

१. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
२. आधार कार्ड
३. अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळेचा दाखला / १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र (यांपैकी एक)
४. रेशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला (यांपैकी एक)
५. हमीपत्र
६. बँक पासबुक

PM Kisan: हे काम केले नाही, तर PM किसान योजनेचा हप्ता विसरा

लाडकी बहीण योजना यादीत नाव कसे शोधावे?

१. आधार कार्ड लिंक असल्याने यादीत नाव शोधणे सोपे आहे.
२. त्यासाठी लाडकी बहिण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या नावाने लॉगीन करा
३. लॉगीन केल्यावर तुमचे यादीत नाव आहे किंवा नाही ते समजू शकेल.
४. जवळच्या संगणक केंद्र किंवा सीसीसी केंद्रावरही तुम्हाला ही माहिती मिळू शकेल.

लाडकी बहीण योजना पैसे चेक कसे करायचे?

१. तुमचे आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन खात्यावरील रक्कम तपासा
२. सीसीसी केंद्रांच्या माध्यमातून आधार कार्ड लिंक केलेल्या खात्यात पैसे जमा झाल्याचे समजेल.
३. लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगीन करूनही तपासता येईल.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *