राज्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच, कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून योग्य विल्हेवाट लावल्यास गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमावर परिणाम होईल.
पीक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना:
– ज्वारी आणि गहू काढणी व मळणी झाल्यानंतर धान्य उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावे.
– मका पिकाला आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5% (4 ग्रॅम) किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी (4 मिली) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
– भुईमूग पिकात तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. रसशोषक किडींसाठी इमिडाक्लोप्रिड 18.8% (2 मिली) किंवा क्विनॉलफॉस 25% (20 मिली) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतकऱ्यांनी हवामान बदलांचा विचार करून योग्य उपाययोजना केल्यास पिकांचे नुकसान टाळता येईल.
#KrushiSalaa #WeatherAlert #CropManagement #FarmerGuidance #AgriNews #MaharashtraAgriculture #PikVavastha