जय किसान फोरम तर्फे राज्यातील ४० शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान
Kanda : कांद्याच्या रोषामुळे शेतकऱ्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीला संसदेत पाठवले त्यामुळे कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम लढत राहिल अशी भावना खा. भास्कर भगरे सरांनी व्यक्त केली.
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त जय किसान फार्मर्स फोरम तर्फे रावसाहेब थोरात सभागृह येथे झालेल्या कृषिरत्न पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. जयराम पूरकर, मुंबई आकाशवाणीचे सहायक संचालक डॉ.संतोष जाधव, इफकोच्या संचालिका साधनाताई जाधव, मा. जि. प. सदस्य गोरकभाऊ बोडके, डॉक्टर किसान चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनिल दिंडे, सेंद्रिय शेतीतज्ञ सदुभाऊ शेळके, डॉ. सुभाषराव शिंदे, सैनिक फेडरेशनचे डी. एफ. निंबाळकर, पांडुरंग चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय जाधव यांनी पंजाबराव देशमुखांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी विषमुक्त शेतीची गरज असून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. तर ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. जयराम पुरकर यांनी सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन केले. मुंबई आकाशवाणीचे सहाय्यक संचालक डॉ. संतोष जाधव यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.
हेही बघा : कांदा बाजारभाव वाढतील का?
मान्यवरांच्या हस्ते ४० शेतकऱ्यांचा ट्रॉफी, पैठणी, सन्मानपत्र व शेतकरी गौरव विशेषांक देवून सपत्निक सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पोपटराव निकम, समाधान वाघ, भटू खैरनार, नामदेव गायकवाड, धनराज जगताप, शितल महाजन, किशोर वाडेकर, भूषण पगार, भाऊसाहेब पवार, अक्षय गिते, बाळासाहेब चव्हाण, गणेश झोमण, योगेश मातेरे, राजेंद्र पगार, सिताराम चव्हाण, गोरख शिंदे, संपत आहेर, गोरख पारधी, अमोल लगड, विनोद परदेशी, ज्ञानेश्वर पवार, साजेदा अल्ताफ शेख, सुनंदा लाड, दत्तात्रय खेमनर, अशोक भोसले, दत्तात्रय ताले, निळकंठ साबळे, लक्ष्मी मोरे, दिनेश पाटील, छाया भिसे, योगेश पाटील, निवृत्ती इंगोले, सुरेश नाठे, सचिन इंगळे, श्रध्दा कासुर्डे, परशराम निकम, सुनिल बोरसे, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिभा चावडे, पंकज बच्छाव यांचा समावेश आहे.
यावेळी आमची माती आमची माणसं मासिकाचा “शेतकरी गौरव विशेषांक आणि ज्येष्ठ कृषि शास्त्रज्ञ डॉ. जयराम पूरकर यांच्या सेंद्रिय शेतीतून प्रगतीकडे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांचा सुमधुर मराठी गितांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम झाला असून प्रसिद्ध निवेदक व कलावंत तुषार वाघुळदे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपीनाथ लामखडे, गोरक्षनाथ जाधव, भगवान खरे, निवृत्ती न्याहारकर, मयुर गऊल, सविता जाधव, उत्तम रौंदळ, नाना पाटील, बाळासाहेब मते, सुयोग जाधव, सुनिल गमे, स्नेहल लामखडे, संतोष केदारे, माधुरी न्याहारकर, संकेत लामखडे, संदिप उफाडे, आदिंनी केले आहे.
कांद्यामुळे माझ्यासारखी सर्वसामान्य व्यक्ती खासदार झाली. मला असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळे मला देव्हाऱ्यात सोन्याचा कांदा ठेवायची इच्छा होती. परंतु चांदीचा कांदा ठेवणे शक्य झाले. अशी प्रांजळ भावना भगरे सरांनी व्यक्त केली. यावेळी खा. भगरे सरांना जय किसान फार्मर्स फोरम तर्फे कांद्याने भरलेली बैलगाडीची प्रतिकृती व कांदा रत्न हे मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.