kanda bajarbhav

kanda bajarbhav: कांदा बाजारभाव वाढता वाढता वाढे; पुढच्या आठवड्यातही वाढणार

kanda bajarbhav today आज सकाळी म्हणजेच शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी लासलगाव बाजारसमितीत कांदा लिलाव सुरू झाले, तेव्हा चांगल्या प्रतीचा कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आनंदाचा धक्का बसला, कारण अनेकांना सकाळी ११ पर्यंत २८०० रुपये प्रति क्विंटल रुपये बाजारभाव त्यांच्या १ नंबर कांद्यासाठी मिळाला.

लासलगावमध्ये कांदा बाजारभाव (kanda bajarbhav) वाढले

कांदा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ नंतर लिलाव सुरू झाले आणि ११ पर्यंत कांदा बाजारभाव लाल कांद्यासाठी २२०० रुपये ते २८०० रुपये प्रति क्विंटल असा होता. बाजारसमितीकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार लासलगावच्या विंचूर (Lasalgaon vinchur onion market)  बाजारसमितीत आज लाल कांद्याला सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल, तर किमान बाजारभाव १ हजार आणि कमाल २७०० रुपये प्रति क्विंटल असा होता.

पिंपळगाव बसवंतच्या बाजारसमितीत (Pimpalgaon basvant kanda bajarbhav) आज पोळ कांद्याला सरासरी २२०१, तर जास्तीत जास्त २८०० रुपये बाजारभाव मिळाला. पुणे जिल्ह्यातील मोशी बाजारात जास्तीत जास्त ३५०० रुपये आणि सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

सोमवारी कसे राहतील कांदा बाजारभाव

मागच्या रविवारपासून राज्यातील आणि देशातील आवक घटल्याने बाजारभाव वाढले असे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लासलगावच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की गुजरातमध्ये अपेक्षित असलेल्या सुमारे दोन ते अडीच लाख टन कांद्याची आवक या आठवड्यात झाली नाही, परिणामी देशभरात आवक घटली आणि बाजारभाव वाढले. आठवडाभरात एकूण ५ ते ७ रुपयांनी बाजारभाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान सोमवारीही बाजारभाव टिकून राहतील आणि त्यात वाढ होईल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर हीच स्थिती राहिली, तर कांदा बाजारभाव आणखी वाढतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा -सौजन्य : पंकज जोशी, ॲग्रो शिवार)

शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल आणावा..

चार पैसे जास्त मिळत आहेत, हे वाचून किंवा बघून शेतकरी एकदम बाजारात कांदा घेऊन विक्रीसाठी गर्दी करतात. परिणामी आवक वाढून भाव पडतात. मात्र शेतकऱ्यांनी आपला कांदा टप्याटप्प्याने बाजारात विक्रीला आणावा, त्यामुळे आवक एकदम फुगणार नाही आणि भावही कोसळणार नाही असे आवाहन कांदा उत्पादकांच्या प्रतिनिधींनी केले आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजारातील भाव असे आहेत

शेतमाल : कांदा (kanda bajarbhav) दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/12/2024
कोल्हापूर क्विंटल 5025 1000 4200 2200
जालना क्विंटल 205 1200 5000 2200
अकोला क्विंटल 270 1500 2800 2000
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 1950 300 2200 1250
सातारा क्विंटल 506 1000 3000 2000
कराड हालवा क्विंटल 198 2500 3500 3500
सोलापूर लाल क्विंटल 31858 200 4200 1900
बारामती लाल क्विंटल 371 1000 3600 2500
येवला लाल क्विंटल 10000 300 2651 2050
येवला -आंदरसूल लाल क्विंटल 4000 300 2360 2050
अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 510 600 2000 1300
धुळे लाल क्विंटल 427 200 2370 2100
लासलगाव – निफाड लाल क्विंटल 2622 1000 2716 2450
लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 2500 1000 2700 2300
जळगाव लाल क्विंटल 2410 877 2562 1750
धाराशिव लाल क्विंटल 22 1300 2500 1900
नागपूर लाल क्विंटल 500 1200 2400 1800
सिन्नर – नायगाव लाल क्विंटल 298 400 2340 2100
कळवण लाल क्विंटल 2050 800 2705 1805
चांदवड लाल क्विंटल 12135 1001 2619 2220
मनमाड लाल क्विंटल 3100 400 2901 2000
नेवासा -घोडेगाव लाल क्विंटल 27306 1000 3200 2800
पिंपळगाव(ब) – सायखेडा लाल क्विंटल 1533 1000 2400 2100
शिरपूर लाल क्विंटल 167 200 3150 1950
भुसावळ लाल क्विंटल 4 2000 2500 2500
जालना लोकल क्विंटल 1735 200 1300 800
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 4638 1000 3800 2400
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 9 1300 2000 2000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 633 1000 3500 2250
वडगाव पेठ लोकल क्विंटल 250 2800 4000 3200
वाई लोकल क्विंटल 15 1500 6000 4000
मंगळवेढा लोकल क्विंटल 90 300 3300 3000
शेवगाव नं. १ क्विंटल 530 2500 3300 2750
शेवगाव नं. २ क्विंटल 500 1600 2400 1950
शेवगाव नं. ३ क्विंटल 510 500 1500 1200
नागपूर पांढरा क्विंटल 340 1400 2600 2300
नाशिक पोळ क्विंटल 2130 900 2700 1900
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 12266 1250 2800 2201

 

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *