grape farmer and farmer’s cheating issues, शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे. द्राक्ष उत्पादकांसह अन्य उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीदरम्यान फसवणुकीचा सामना करावा लागतो. त्या द्राक्ष आणि फळबागांच्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. आता त्यासाठी राज्याचा कृषी विभाग लवकरच पाऊल उचलण्याच्या तयारीत असून नवीन कायदा आणणार आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture minister Manikrao Kokate) यांनी नाशिक येथे नुकतीच ही घोषणा केली. शेतकऱ्यांची द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सवर्कष स्वरूपाचा कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. दरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश मंत्री ॲड. कोकाटे यांनी पोलीस विभागाला दिले.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांच्या मालमत्ता होणार सील
शेतकरी हा पूर्णत: शेतात पिकणाऱ्या पिकांवर अवलंबून असतो. शेतीमालाला योग्य भाव मिळेल त्या ठिकाणी तो शेतीमालाची विक्री करीत असतो. काही वेळेस फसवणुकीच्या घटना घडतात. यासाठी शेतकऱ्यांना जो व्यापारी माल घेणार आहे, त्या व्यापाऱ्याची माहिती असणे आवश्यक आहे. फसवणूक करणाऱ्या (farmer cheating) संशयित आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी करावी.
याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी कृषी विभागातर्फे मोहीम राबविण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणुकीपोटी झालेल्या ४६ कोटी रूपयांच्या वसुलीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक व्यापाऱ्यांच्या मालमत्ता सील कराव्यात. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल. असेही मंत्री श्री. कोकाटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना सांगितले.
दरम्यान नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. कराळे म्हणाले की, शेतकऱ्यांनी फसवणूक प्रकरणी पोलिस अधीक्षक यांची भेट घ्यावी. शेतमाल देताना व्यापाऱ्यांकडून सौदा पावती करून घ्यावी. जेणेकरून फसवणूक झाली, तर कायदेशीर करवाई करता येईल. तसेच व्यापाऱ्यांची पार्श्वभूमी समजावून घ्यावी. कृषी विभाग, द्राक्ष बागायतदार आणि पोलिसांतर्फे जनजागृती करण्यात येईल.