शेतकरी मित्रांनो; तुमच्या फोनमधील हे अ‍ॅप्स त्वरित उडवा

शेतकरी मित्रांनो; तुमच्या फोनमधील हे अ‍ॅप्स त्वरित उडवा

ऐन दिवाळीच्या मुर्हूतावर गुगल प्ले स्टोअरने हे अ‍ॅप्स हटविले

गुगलने असे दीडशेवर अ‍ॅप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहेत. सर्व अ‍ॅप्स अल्टीमाएसएमएस कॅम्पेनशी संबंधित असल्याचे सांगितले जातेय. गुगलने हे अ‍ॅप्स काढून टाकल्याने आता वापरकर्त्यांनाही ते आपल्या फोनमधून त्वरित हटवावी लागणार आहेत. अन्यथा फार मोठा अनर्थ घडू शकतो. कारण ही सर्व अ‍ॅप्स वापरकर्त्यांना प्रिमियम एसएमएस सर्व्हिस पुरविण्याचे आमिष दाखवून साईन इन करायला सांगत होती. ही लालच देऊन वापरकर्त्यांना लालूच दाखवून त्यांचा डाटा, महत्तवाची माहिती चोरी केली जात होती. त्यात आयएमईआय क्रमांकाचीही चोरी होत आहे. तसेच फोन क्रमांकालाही ट्रॅक केले जात होते.

वापरकर्त्याच्या फोन मधून त्याचे लोकेशन, फोन क्रमांक, फोनमधील स्टोअरेज, कॅमेरा इत्यादी सर्व माहिती हस्तगत करून त्याचा परस्पर क्यू आर कोड स्कॅन करून बॅँक खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा एसएमएस वाचून त्याद्वारे ओटीपी सारखे महत्त्वाचे घटक मिळवून विविध प्रकारे फसवणूक करण्यासाठी, केवळ आर्थिकच नव्हे, तर कॅमेरा गुपचूप आॅन करून तुमचे खासगी क्षण, बोलणे रेकॉर्ड करून त्याचा पॉर्नसाठी वापर करण्यापर्यंत गैरकृत्ये या अ‍ॅपमुळे होत होती. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने ही सर्व अ‍ॅप्स आता गुगलने काढून टाकली आहेत. मात्र तुमच्या फोनमध्ये एसएमएसशी संबंधित काही अ‍ॅप्स असतील, तर त्वरीत त्यांना डिलिट करा.

एकीकडे दिवाळीच्या शुभेच्छांचा सर्व सोशल मीडियावरून वर्षाव होत आहे. सगळीकडे आनंदीआनंद आहे. अनेक स्मार्टफोन धारक विविध अ‍ॅप्सचा वापर करून दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे गुगल प्ले स्टोअरने वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनमध्ये नेहमी आढळणारी काही अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकल्याने तो एक चर्चेचा विषय होत आहे. एक कोटी पेक्षाही वापरकर्त्यांनी हे अ‍ॅप्स डाऊनलोड केले होते हे विशेष.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *