ई-श्रम पोर्टल वर 30.68 कोटींहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी

ई-श्रम पोर्टल वर 30.68 कोटींहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी

श्रम व रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी ई श्रम पोर्टल (eshram.gov.in ) चा प्रारंभ केला होता. या पोर्टलद्वारे एक सर्वसमावेशक राष्ट्रीय असंघटित कामगार माहितीसाठा (NDUW) तयार करून त्याला आधारशी जोडणे हा त्यामागचा उद्देश होता. असंघटित कामगारांची  ई  श्रम पोर्टल वर नोंदणी करून त्यांना स्वयंघोषणेच्या आधाराने  सार्वत्रिक खाते क्रमांक (UAN) दिला जातो.  ई  श्रम पोर्टल वरती 3 मार्च 2025 पर्यंत  30.68 कोटीहून अधिक  असंघटित कामगारांची नोंदणी झाली असून त्यापैकी निम्म्याहून जास्त ( 53.68% ) महिला आहेत.ई  श्रम पोर्टलचा लाभ जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचवण्यासाठी श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे 7 जानेवारी 2025 ला भाषिणी व्यासपीठामार्फत हे पोर्टल  विविध भाषांमधून वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे हे पोर्टल सर्वसमावेशक व सुलभ झाले असून आता  कामगारांना 22 भारतीय भाषांमधून या पोर्टलचा वापर करता येईल.

ई श्रम व त्यासोबतच्या सर्व सेवांचा लाभ कामगारांना सहजपणे घेता यावा यासाठी श्रम व रोजगार मंत्रालयाने 24 फेब्रुवारी 2025 रोजी ई  श्रम मोबाईल  अँप चा प्रारंभ केला आहे. ई  श्रम पोर्टलशी  संबंधित कल्याणकारी योजनांची अद्ययावत माहिती या अँप वर उपलब्ध असून तिचा वापर करणे कामगारांना सुलभ जाईल अशी तिची रचना आहे.

असंघटित कामगारांमध्ये जागृती वाढवण्यासाठी मंत्रालयाने टाकलेली पाऊले :

  • राज्ये व केंद्रशासित प्रदेशांबरोबर  नियमित आढावा बैठक घेणे
  • सामायिक सेवा केंद्रांबरोबर (CSC) नियमित बैठक
  • कौशल्यविकास व रोजगार संधी मिळवून देण्यासाठी ई  श्रम पोर्टलला राष्ट्रीय करियर सेवा  व स्किल इंडिया डिजिटल पोर्टल शी जोडले आहे.
  • निवृत्तीवेतन योजनांमध्ये सुलभतेने नोंदणी होण्यासाठी इ श्रम पोर्टल ला प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजनेशी (PMSYM) जोडले आहे.
  • सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी ई  श्रम पोर्टलला मायस्कीम पोर्टलशी जोडले आहे.
  • जागृती निर्माण करण्यासाठी एसएमएस मोहीम

लोकसभेत एका लिखित उत्तरात केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज ही माहिती दिली.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *