नागपूरच्या साईली सोलवचा क्रिस्टल्स आणि पर्ल्सचा जादूई प्रवास
‘‘निरभ्र स्वच्छ आकाशात लखलखते तारे,
त्यातून पृथ्वीवर सुंदर रंग सांडले
सांडलेले रंग चमकत्या मण्यांच्या रूपी विखुरले,
तेच साईलीच्या चमकत्या सुंदर पर्समधून, कीचेनमधून, माळामधून सांडले..’’
साईली सोलव ही मूळची नागपूरची. तिने हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये उच्च शिक्षण घेतलं आहे. तिचं क्रिस्टल, पर्ल आणि स्टोन क्रिस्टल यापासून तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन नुकतंच पाहिलं. यातील सर्व वस्तू तिने एकटीने केल्या होत्या.
खरे तर मी फारशा फॅशनच्या वस्तू किंवा दागिने न वापरणारी. पण तिच्या स्टॉलने जणू मला खेचून घेतलं. इतक्या आकर्षक वस्तू. तिला त्याबद्दल विचारलं तर म्हणाली, ती तिसरीत असल्यापासून अशा वस्तू तयार करायला शिकत होती. त्यातून तिला त्याची आवड निर्माण झाली. गेले चार-पाच वर्षे ती व्यावसायिक दृष्ट्या या वस्तू तयार करून त्यांची विक्री करते आहे.
Chrizmo’ – हाताच्या कुशलतेतून साकारलेलं ब्रँड
केवळ पर्सेस नव्हे तर दिवे, ब्रेसलेट, कानातले, चष्मा पडू नये म्हणून त्याला लावायची मोत्यांची साखळी, कीचेन, मोबाईल कव्हर, visiting card कव्हर… असं बरंच काही तिच्या स्टॉलवर पाहायला मिळालं. हे सगळे तिने स्वतः प्रयोग करत वेगवेगळ्या आकारात तयार केलं आहे. काही वस्तूंची निर्मिती तिने गरज पाहून केलेली आहे. ती हाडाची कलाकार आहे.
Perfection आल्यानंतरच तिने या सर्व वस्तू विक्रीसाठी आणल्या. त्यासाठी खूप मेहनत घेतली. एक वस्तू तयार करायला किमान दोन-अडीच तास लागतात. या वस्तू महिलावर्गाला इतक्या आवडल्या की आता परदेशातून सुद्धा त्यांना मागणी आहे.
कोरियन मणी, भारतीय स्पर्श
ती यासाठी लागणारे पर्ल, क्रिस्टल कोरियामधून मागवते. त्याचा दर्जा आणि चकाकी यामुळे. शिवाय ते लवकर खराब होत नाही. आपण पाहतो तेव्हाच ते वेगळेपण लक्षात येतं. एक प्रकारचा richness जाणवतो. साईलीने आतापर्यंत नागपूर आणि नाशिकमध्ये प्रदर्शनात या वस्तू ठेवल्या होत्या. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता दिल्ली, मुंबई येथेही प्रदर्शन भरवायचा तिचा विचार आहे. तिला भविष्यात आपला व्यवसाय विस्तारित करायचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे. त्यासाठी एक टीम तयार करायची आहे.
परिवाराचा आधार आणि भविष्यातील स्वप्नं
या सगळ्यात तिला तिच्या आजी सुधा कडासने, आईबाबा समा आणि हेमंत सोलव, मामा मामी डॉ. रवी आणि डॉ. अंजली कडासने, माजी पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि त्यांच्या पत्नी साक्षी – या सगळ्यांचे मोठे पाठबळ आहे. त्यांच्या आशीर्वादानेच ती हे काम पुढे नेते आहे. तिच्या दुबईला प्रॅक्टिस करणाऱ्या मामी डॉ. अंजली तिच्याकडून या सगळ्या वस्तू मागवून घेतात. दुबईमध्ये “क्रिझमो”च्या वस्तूंना खूप मागणी आहे.
“क्रिझमो” या ब्रँडनेम अंतर्गत असलेल्या या वस्तू खरेच रात्रीच्या काळ्याभोर आकाशातील चांदण्यांशी स्पर्धा करत असल्यागत भासतात.
तिला तिच्या या व्यवसायासाठी भरपूर शुभेच्छा. भेट म्हणून द्यायला, एखाद्या समारंभात स्वतः वापरायला या वस्तू किती युनिक आहेत! तुम्ही यातली एखादी पर्स घेऊन गेलात तर तुम्हाला विचारणा होणारच, “ही पर्स कुठून घेतली?”
तुम्हाला भेटवस्तू हवी आहे का? एखाद्या समारंभात उठावदार अॅक्सेसरी हवी आहे का? ‘Cryzmo च्या खास कलेक्शनसाठी आजच या 8999640291 मोबाईलवर संपर्क करा!
-शिल्पा-दातार-जोशी, वरिष्ठ पत्रकार