पशुसंवर्धन योजनांसाठी आता एकदाच अर्ज; मोबाईल ऍपद्वारे लाभ
ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन व शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देत ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवतानाच पुन्हा अर्जाची प्रक्रिया करावी लागू नये म्हणून प्रतीक्षा यादीची तरतूद केली आहे. अमरावती जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी व पशुपालक बांधवांना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
या योजनेसंदर्भात अधिक माहिती देताना पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव खेरडे म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध योजनांचा लाभ शेतकरी व पशुपालक बांधवांना मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येत असून, प्रतीक्षा यादीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे पुन...






