तरुणांसाठी कर्जावरील व्याज परताव्याची योजना, आपण लाभ घेतला?
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून मराठा समाजातील होतकरू पण बेरोजगार तरुणांपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे. योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे यासाठी राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली असून महामंडळातर्फे उदद्योग व्यवसायासाठी देण्यात येणाºया कर्जावरील व्याजाचा परतावाही दिला जातो. आजतागायत राज्यात दीड लाखांहून अधिक तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला असून ते आता उद्योजक झाले आहेत.
तेंडोली, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी मनोहर राऊळ सांगतात की मी १२ वी पास झालो होतो पण आर्थिक परिस्थितीमुळे महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकलो नाही म्हणून मी पुणे येथे बँटरी दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. या अनुभवाचा स्वयंरोजगारासाठी उपयोग करून घेण्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज होती. त्याव...






