बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजना; आपण लाभ घेतलात ?
केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियान (एसएमएसपी) या योजनेतील बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी बाबतचा आढावा आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. या योजनेत चांगल्या पद्धतीने सुरु असलेल्या शेतकरी बियाणे उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, अन्नधान्य उत्पादक संघ आदींचा सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान अंतर्गत असणारी बियाणे व प्रक्रिया साठवण केंद्र उभारणी ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. राज्यात या प्रकल्पासाठी 50 प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले होते. महत्त्वाच्या पिकांचे क्षेत्र लक्षात घेऊन लक्षांक निर्धारित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने एकूण 48 प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी 42 प्रस्ताव पात्र ठरले. उर्वरित पैकी चार रद्द तर दोन अपात्र ठरवण्यात आले. आजमितीस एकूण 16 प्रकल्प पू...






