Monday, December 1

शेती तंत्र

द्राक्ष फवारणीसाठी टिप्स्
शेती तंत्र

द्राक्ष फवारणीसाठी टिप्स्

* द्राक्ष वेलीच्या औषध फवारणीपूर्वी द्राक्ष वेलीची पांढरी मुळी कार्यक्षम आहे का, ती पहावी. * औषध फवारणीसाठी वापरण्यात येणार्‍या पाण्याचा पी. एच. ६.५ ते ७ च्या दरम्यान असावा. * एखादे आंतरप्रवाही औषध फवारले तर त्यानंतरची फवारणी ही स्पर्शजन्य औषधाची करावी. * आंतरप्रवाही किटकनाशकानंतर आंतरप्रवाही किटकनाशक फवारू नये. त्यामध्ये स्पर्शजन्य औषधाची फवारणी करावी. * जैविक बुरशीनाशकाची फवारणी करताना टँकमधील पूर्वीचे औषध काढून टाकावे. * कोणत्याही औषधाची फवारणी करताना औषध शोषून घेेणार्‍या स्प्रेडरचा वापर करावा. * अतिकडक औषधे उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर फवारावीत. * फवारणी करतेवेळी स्क्रॅचिंग येणार नाही, याची काळजी घ्यावी....
ऊस, ज्वारी व भाजीपाल्यांवरील कीड, रोग नियंत्रण
शेती तंत्र

ऊस, ज्वारी व भाजीपाल्यांवरील कीड, रोग नियंत्रण

सुरू ऊस सुरू उसाच्या लागवडीकरिता को-८६०३२ (निरा), को-९४०१२ (सावित्री), को. एम. ०२६५ (फुले-२६५) या जातींचे १० ते ११ महिने वाढीचे चांगले जाड, रसरशीत डोळे फुगलेले बेणे निवडावे. सुरू उसाची लागवड कोरड्या पद्धतीने केल्यास चांगली होते. ओली लागवड करावयाची असल्यास दोन डोळ्यांची टिपरी दोन टिपरीमधील अंतर १५-२० सें. मी. ठेवून मांडावीत. नंतर सरीत पाणी सोडून डोळे बाजूला येतील, अशा पद्धतीने पाण्यात दाबावीत. लागवडीपूर्वी प्रतिहेक्टर बेण्यासाठी १०० ग्रॅम बाविस्टीन अधिक ३०० मि. लि. मॅलॅथिऑन अधिक १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर १० किलो ऍसिटोबॅक्टर जिवाणू अधिक १०० लिटर पाणी या द्रावणात वरील बेणे ३० मिनिटे बुडवून लागवड करावी. त्यामुळे उसासाठीच्या नत्र खताच्या मात्रेमध्ये ५० टक्के बचत होते. लागवडीच्या वेळी प्रतिहेक्टर २५ किलो नत्र (५४ किलो युरिया) अधिक ६० किलो स्फूरद (३७५ किलो...
तुरीवरील किडींचे फुलोरा अवस्थेपासूनच व्यवस्थापन करा
शेती तंत्र

तुरीवरील किडींचे फुलोरा अवस्थेपासूनच व्यवस्थापन करा

तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरणे या अतिशय संवेदनशील अवस्था असून यावर मारूका, शेंगा पोखरणारी अळी व शेंग माशी या किडींचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. पिकाचे नुकसान शेवटी पीक काढणी झाल्यावर उत्पादनात घट दिसून येते. नॆसर्गिक वातावरणात क्रायसोपा, भक्षक कोळी, ढालकिडा या मित्र कीटकांची संख्या वाढत असते. त्यामुळे थेट रासायनिक किटकनाशकाची फवारणी न करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा म्हणजे मशागतीय, यांत्रिकीय, जैविक पध्दतींचा अवलंब करावा. या पध्दती कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असुन मित्रकीटकांना व मानवी आरोग्याला हानी होत नाही. पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यापासून जैविक कीटकनाशकाचा व किडींच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. जर किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास तेव्हाच लेबलक्लेमनुसार रासायनिक किटकनाशकाची फवारणी केली पाहीजे. शेतकरी बांधवानी पिकाचे संरक्षण करण्यासा...
असे करा रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन
शेती तंत्र

असे करा रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन

खरीप हंगामात पाऊस चांगला झाल्याने निश्चितच रब्बीच्या पिकास फायदा होईल. पण वातावरणातील व निसर्गाचा लहरीपणा यांचा सामना करण्यासाठी योग्य कालावधीत पिकांच्या संवेदनशील अवस्था ओळखून व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. रब्बी पिकांना त्यांच्या वाढीच्या विविध नाजूक अवस्थांमध्ये पाणी देणं गरजेचं असतं. तसेच पाण्याची बचत व पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादनात भरीव वाढ मिळविता येते व जमिनीची अतिरिक्त हानीसुद्धा टाळता येऊ शकते. चला तर मग आपण रब्बी हंगामातील पाणी व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची माहिती घेऊयात. *** पीक उत्पादनाच्या दृष्टीने रब्बी पिकांत पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं असतं. कारण, जमिनीची सुपीकता मुख्यतः जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांवर अवलंबून असते. अन्नद्रव्याची उपलब्धता ही जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये मुख्य...
भाजीपाला पिकांवरील फळमाशी नियंत्रणासाठी उपाय
शेती तंत्र

भाजीपाला पिकांवरील फळमाशी नियंत्रणासाठी उपाय

वेलवर्गीय भाजीपाला (उदा. काकडी, भोपळा, कारली) पिकांवरील फळमाशीचे नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळे काढून नष्ट करावीत. प्रौढ माशीसाठी क्युलयूर रसायनयुक्त सापळे एकरी ५ या प्रमाणात लावावेत. तसेच २० मि. लि. एन्डोसल्फान + १०० ग्रॅम गूळ + १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. (more…)
कोरडवाहूसाठी पर्याय  रब्बी ज्वारी
शेती तंत्र

कोरडवाहूसाठी पर्याय रब्बी ज्वारी

दुष्काळी परिस्थितीत रब्बी ज्वारी ही अन्नधान्यासाठी तसेच गुराढोरांना लागणार्‍या कडब्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. रब्बी ज्वारीचा पेरणीचा कालावधी फार महत्त्वाचा आहे. ज्वारीची वाढ ही ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाच्या ओलाव्यावर अवलंबून असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास येणार्‍या रब्बी हंगामात निश्‍चितच रब्बी ज्वारीचे उत्पादन व उत्पादकता वाढेल. रब्बी जातीचे सुधारित वाण रब्बी ज्वारीसाठी अजूनही शेतकरी पारंपरिक जातीचे तसेच घरगुती बियाण्यांचा वापर करतात. यामुळे उत्पादन कमी येते. उत्पादन चांगले येण्यासाठी शेतकर्‍यांनी सुधारित वाणाचाच वापर करावा. वाढ खुंटलेल्या कपाशीत पेरणी वाढ खुंटलेल्या कपाशीतसुद्धा रब्बी ज्वारीची पेरणी करता येईल. ही पेरणी उभ्या कपाशीच्या चार ओळीनंतर (म्हणजेच दोन ओळींमध्ये) करता येते. तसेच हरभरा, करडी यांसारखे पीक कपाशीच्या प्रत्येक दोन ओळींमध्ये घेता येऊ शकते. बियाण...