अशी राखा कोंबडयांची निगा
कोंबडयांची निगा : कोंबडयांचे तीन गट पडतात. पहिला गट आठवडयापर्यत, दुसरा 9 ते 18 – 20 आठवडयापर्यंत व तिसरा 18 – 20 आठवडयानंतर. खाद्याचे देखील तीन प्रकार असतात. आठ आठवडयापर्यंत चिक मॅश, 9 – 16 / 18 आठवडयांपर्यंत ग्रोअरमॅश व त्यानंतर लेअर मॅश असे म्हणतात. या तिन्ही प्रथिनांचे प्रमाण अनुक्रमे 22,14 व 16 टक्के असावे. खाद्यात दोन प्रकारचे अन्नघटक असावेत. 1) ऊर्जा पुरविणारे 2) प्रथिने पुरविणारे. ऊर्जा पुरवियासाठी मका, ज्वारी, बाजरी, बारली, गहू ही धान्ये वापरतात तर प्रथिनांसाठी शेंगदाणा, सोयाबीन, तीळ पेंड तसेच मासे, मटण, खत इत्यादींचा उपयोग करावा.
कोंबडयांचे खादय : एकूण खर्चाच्या 60 – 70 टक्के खर्च खाद्यावर होतो. त्यासाठी ते किफायतशीर ठरण्यासाठी खादय संपूर्णत: व चांगले असावे. खादय वाया जाणार नाही अशा चांगल्या भांडयात अर्धेभरुन व्यवस्थित खाऊ घालावे.
खाद्यातील अन्नघटक (टक्के):
 ...






