शास्त्रीय पद्धतीनेच करा गहू बीजोत्पादन
आनुवंशिक आणि भौतिकदृष्ट्या शुद्ध असणारे गहू बियाणे तयार करणे फायदेशीर ठरते. गव्हामध्ये बीजोत्पादन क्षेत्रापासून तीन मीटर अंतरावर त्याच जातीचे पीक असू नये. बीज प्रमाणीकरण संस्थेने प्रमाणित केलेले बियाणे वापरावे. बियाण्याच्या पिशवीवर असलेले लेबल व बियाणे नमुना जपून ठेवावा.
• गहू बीजोत्पादनासाठी बियाणे निवड :
करताना आपल्याला कोणत्या प्रकारचे बियाणे लागवडीसाठी वापरायचे आहे, ते निश्चित करावे. पायाभूत बियाणे तयार करण्यासाठी मूलभूत बियाणे आणि प्रमाणित बियाणासाठी पायाभूत बियाणे वापरावे. बियाणे खरेदी करताना बीज प्रमाणीकरण संस्थेने प्रमाणित केलेले बियाणे वापरावे. बियाण्याच्या पिशवीवर असलेले लेबल व बियाणे नमुना जपून ठेवावा.
• बियाणे प्रक्षेत्र नोंदणी :
प्रमाणित बीजोत्पादन घेण्यापूर्वी त्यांची नोंद जिल्हा बीज प्रमाणीकरण कार्यालयात करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित कार्यालयात संपर्क करावा.
• ...






