अतिरिक्त उत्पन्नासाठी करा शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन
अनियमित पर्जन्य, हवामानातील बदल यामुळे कृषि उद्योगासमोर निरनिराळी आव्हाने उभी राहिली आहेत त्यातूनच उद्भवणारे कर्जबाजारीपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण बनत आहे. त्यावर उपाय म्हणून कर्जमाफी वैगेरे योजना येत असतात. पण त्या तितक्या प्रभावी नसतात हे सर्व बदलण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया जास्त आत्मनिर्भर बनवले पाहिजे. शासनाची शेततळे योजना म्हणजे शेतीसाठी खात्रीशीर जलस्त्रोत शेततळ्यांच्या आकारमानानुसार काही लाख लिटर पासून काही कोटीं लिटर पर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहेत. शेततळ्यांमुळे शेतजमीन पाणीसाठयासाठी जमिन अडकून राहते. पाणी स्वच्छ ठेवणे ही जिकरीचे होऊन जाते. जमिन अडकल्यामुळे उत्पादनात घट होते म्हणूनच या शेततळ्यांचा उपयोग करून कमीत कमी श्रमात मत्स्यव्यवसाय करून उत्तम उत्पन्न कमावता येते.
शेततळे सोडून मत्स्य तलाव जागा निवडीची तत्त्वे -
भूप्रदेश – मत्स्यतलावाची जागा निवड करताना जागेचा उत...






