दुधवाढीसाठी अशी घ्या गाईची काळजी
दुग्धेात्पादन हा शेतक-यांसाठी नियमित व हमखास उत्पन्न देणारा जोडधंदा आहे. दुध उत्पादनासाठी गाई, म्हशी जास्त दुध देणा-या असाव्यात. गीर व देवणी जातीस जर्सी व फ्रिजियनपासुन संकरित केलेले वाण ‘फुले त्रिवेणी’ जास्त दुध देणारे सिध्द झाले आहेत.
हल्ली गुरांच्या बाजारातुन संकरित गाई, कालवडी उपलब्ध होत आहेत. मु-हा, मेहसाणा, जाफ्राबादी आणि सुरती या म्हशी दुध उत्पादन सरस आहेत. किफायतशीर दुध उत्पादनासाठी साधारणत: फ्रिजीयन देवणी यांचा संकरीत वाण ‘होलदेव’ सरस ठरला आहे.
१. गाभण जनावरांची निगा :
गाभण गाई सातव्या व म्हशी आठव्या महिन्यानंतर कळपातुन वेगळया कराव्यात. वेगळया केलेल्या गाईना स्वतंत्र हवेशीर, कोरडया व स्वच्छ गोठयातुनच खाऊ घालावे. चराईसाठी लांबवर नेऊ नये.
रोजच्या आहाराचे नियंत्रण पुढिल तक्त्यात दिल्याप्रमाणे करावे, जेणेकरुन गर्भाचे व आईच्या शरीराचे पोषण उत्तम होईल.
गर्भकाळ (महिने)...






