खरीप विशेष : कापूस पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन
कापूस पिकासाठी अनुकूल हवामान आणि पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. त्यासोबतच वेळोवेळी सूक्ष्म अन्नद्रव्ये देणे, हे उत्पादन वाढीचे गमक आहे.
हवामानाचा परिणाम
कापसाच्या बियाण्यांची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश से. तर वाढीच्या अवस्थेमध्ये २० ते २५ अंश से. तापमानाची आवश्यकता असते. फुलोरा अवस्था ते बोंड धरण्याच्या काळात २७ ते ३४ अंश से. तापमान असल्यास उत्तम मानले जाते. उष्ण दिवस व थंड रात्र या प्रकारचे हवामान बोंडे चांगली भरण्यास व उमलण्यास उपयुक्त असते. लागवडीच्या काळात जास्त तापमानाचा विपरित परिणाम होऊन पिकाची उगवण कमी होते आणि नवीन अंकुर वाळतात. जमिनीलगत खोडावर स्कॉचिंग होऊन संपूर्ण झाड लाल होते. यामुळे पिकांची वाढ थांबते. पावसाचा मोठा खंड किंवा जास्त काळापर्यंत जमिनीत ओल नसल्याची परिस्थिती पात्याच्या अवस्थेपासून बोंड पोसण्याच्या कालावधीत असल्यास फुले, पात्यांची व बोंडांची नैसर्गिक गळ होते....



