Monday, December 1

शेती तंत्र

किटकनाशके विकत घेण्यापूर्वी…
शेती तंत्र

किटकनाशके विकत घेण्यापूर्वी…

पिकांवर रोग आणि कीड येऊन पिकाचे उत्पादन कमी येते. परिणामी, शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळायचे असेल तर किटकनाशके वापरून किडींचे, रोगांचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक असते. किटकनाशके विषारी असल्यामुळे ते विकत घेताना, त्याची वाहतूक करताना, हाताळताना काळजी घेणे आवश्यक आहे. कीडनाशक खरेदी करताना शिफारस केलेलेच घ्यावे. प्रत्येक कीडनाशकाच्या डब्यावर किंवा पुड्यावर त्याचे रासायनिक आणि व्यावसायिक नाव लिहिलेले असते. त्याची बारकाईने खात्री करून घ्यावी. फुटलेला किंवा मोहोर नसलेला कीडनाशकाचा डबा किंवा पुडा विकत घेऊ नये. वाहतूक करताना प्रचलित नियमांचे आणि कायद्यांचे पालन करावे. वाहतूक मोठ्या प्रमाणावर करावयाची झाल्यास, शक्यतो स्वतंत्र वाहनांमधून करावी. हे शक्य नसल्यास वाहतूक करताना कीडनाशकांचा अन्नपदार्थांशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. वाहतुकीसाठी कीडनाशकांचे डबे किंवा पुडे व्यव...
असे करा ठिबकवरील कापसाचे व्यवस्थापन
शेती तंत्र

असे करा ठिबकवरील कापसाचे व्यवस्थापन

ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास कापूस पिकाचे अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे अनेक शेतकरी या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. दरवर्षी कापूस पिकाने जमिनीतून शोषून घेतलेली अन्नद्रव्ये भरून न निघाल्यास, पिकांचे संतुलित पोषण न झाल्यास पिकाची जोमदार वाढ होत नाही. कापसाचे जास्त उत्पादन मिळण्यासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. बरेच कापूस उत्पादक शेतकरी ठिबक सिंचन संच उभारल्यापासून बरेच जण दरवर्षी त्याच अंतरावर कापसानंतर पुन्हा कापसाचे पीक घेतात. यामुळे कापूस पिकाने जमिनीतून शोषण केलेल्या अन्नद्रव्यांची भर न पडल्यास बोंडे चांगली पोसली जात नाहीत, बोंडांना वजन येत नाही, झाडांची वाढ खुंटते, पाने लालसर होतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्याबरोबरच पिकास संतुलित पोषण (मुख्य अन्नद्रव्ये- नत्र, स्फूरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्ये-कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये - झिंक, फेरस, बोरॉन) ...
ऊस लागवडीची सुधारित पद्धत
शेती तंत्र

ऊस लागवडीची सुधारित पद्धत

यांत्रिकीकरण व आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. बेणे प्रकारानुसार डोळा पद्धतीचाही अवलंब करता येईल. ऊस पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन असावी, उसाची कोणती जात निवडावी, बेण्यांची निवड, बेणे छाटणी, बेणे प्रक्रिया, लागवड पद्धत आदींविषयी माहिती देणारा हा लेख... जमिनीची निवड ऊस लागवडीसाठी १ मीटर खोली असलेली, मध्यम ते भारी पोताची निचरायुक्त जमीन निवडावी. हेक्टरी २० टन शेणखत द्यावे. १० टन जमीन तयार करताना व १० टन लागवडीच्या वेळी द्यावे. चोपण जमिनीसाठी ५-१० टन जिप्सम प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे. हेक्टरी ४०-६० किलो युरिया, ५० टक्के ७५ किलो एसएसपी व ५ किलो जिवाणू खत द्यावे. लागवड हंगाम व उसाच्या जाती (वाण) पूर्व हंगाम (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) - कोसी ६७१, कोसी ८०१४, कोसी ८६०३, कोसी ७८१९, कोसी ७४०, कोसी ९४०१ सुरू हंगाम (जानेवारी ते फेब्रुवारी) - कोसी ८९०३, कोसी ६७१, कोसी ७५२७, कोसी ...
पावसाच्या पाण्याद्वारे विहीर पुनर्भरण
शेती तंत्र

पावसाच्या पाण्याद्वारे विहीर पुनर्भरण

राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. या पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केल्यास खरिपाबरोबरच रब्बीच्या हंगामाला त्याचा उपयोग होईल. त्यादृष्टीने विहीर पुनर्भरणासारखे प्रयोग शेतकर्‍यांनी जरूर करावेत. शेतात बाहेरून मोठ्या प्रमाणात पाणी येत असेल किंवा शेतात विहिरीच्या बाजूला पाणी साठत असेल अथवा विहिरी जवळून छोटासा ओहळ वाहत असेल तर विहीर पुर्नभरण करता येते. शेतामधून वाहून जाणारे पावसाचे पाणी शेतचारीद्वारे एकत्रित करून विहिरीत सोडण्यात येते, यालाच विहिरीद्वारे भूजलाचे कृत्रिमरीत्या पुनर्भरण म्हणतात. त्यासाठी विहिरीपासून काही अंतरावर ८ बाय ६ बाय ६ फूट आकाराचा खड्डा खोदावा. याला गाळ साठवण हौद म्हणतात, या खड्ड्यात पाणी आल्यानंतर काही काळ पाणी तेथे थांबेल व पाण्यामध्ये आलेला गाळ, काडीकचरा खड्ड्याच्या तळाशी बसेल व नंतर हे पाणी पाईपद्वारे म्हणजेच चाळणीच्या खड्ड्यात सोडण्यात येते. गाळ साठवण खड्ड्...
असे करा व्यवस्थापन टोमॅटोवरील कीड व रोगांचे
शेती तंत्र

असे करा व्यवस्थापन टोमॅटोवरील कीड व रोगांचे

शरीरासाठी पोषक असलेल्या अ, ब आणि क जीवनसत्वांसह चुना, लोह व विविध प्रकारच्या खनिजांनी संपन्न असलेल्या टॉमेटोला वर्षभर मागणी असते. या पिकांवर करपा, फळसड, भुरी, मर, देवी आदी विषाणूजन्य रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोगांच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. त्यासाठी पुढीलप्रमाणे एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन करावे. करपा (अर्लीब्लाईट/लेट ब्लाईट) व फळसड लवकर येणारा करपा सोलॅनी नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाने सुरुवातीस जमिनीलगतच्या पानांवर गोलाकार किंवा आकारहीन वलयांकित तपकिरी काळपट ठिपके येतात. हे ठिपके एकमेकांत मिसळून चट्टे तयार होतात. करपलेली पाने गळून फांद्या कमकुवत होऊन मोडतात. तसेच फळांवरही नंतर असेच डाग पडतात. उशिराचा करपा फायटोप्थेरा बुरशीमुळे होतो. या रोगाने पानथळ ते फिक्कट तपकिरी रंगाचे ठिपके पाने, खोड, फांद्या व फळांवरही येतात. ढगाळ हवामानात ...
खरीप विशेष : सोयाबीन बियाणे पेरताना अशी घ्या काळजी
शेती तंत्र

खरीप विशेष : सोयाबीन बियाणे पेरताना अशी घ्या काळजी

सोयाबीन उत्पादनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी बीजोत्पादन ते पेरणी आणि पीकवाढीच्या अवस्था व काढणीपर्यंतच्या विविध स्तरांवर दिलेल्या शिफारशी व इतर सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले, तर सोयाबीनचे चांगले उत्पादन घेता येते. त्यासाठी या काही टिप्स... सोयाबीन बियाणे हाताळताना व पेरणी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी : *सोयाबीन बियाण्यांस पेरणीपूर्वी पिशवीत ठेवलेल्या बुरशीनाशकांची प्रक्रिया करावी. *पेरणीसाठी आणलेल्या बियाण्यांची पिशवी खालून फोडावी. तसेच बियाण्यांची पिशवी व पिशवीवरील टॅग जपून ठेवावे. *शिफारशीप्रमाणे ७५ ते १०० मि. मी. पाऊस पडल्यानंतरच सोयाबीन बियाण्यांची पेरणी करावी. अल्प पावसावर पेरणी केल्यास बियाणे अर्धवट ओलीवर पडते व पुढे दोन ते तीन दिवस पाऊस न पडल्यास कुजून खराब होते. *सोयाबीन बियाण्यांची ४ ते ५ सें. मी. पेक्षा जास्त खोलीवर पेरणी क...