खरीपातील भुईमुगाची लागवड
भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.५७ लाख टन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ किं./हे एवढी मिळाली. उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हे क्षेत्रावर घेतले होते व त्यापासून १.१९६ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १४५१ किं./हे अशी होती.
जमीन
मध्यम, भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
पूर्व मशागत
एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
सुधारित वाण
अ.क्र
वाण
प्रकार
हंगाम
पक्क होण्यास लागणारा कालावधी (दिवस)
सरासरी उत्पादन (क्विं/हें)
शिफारस
१
एस.बी -१२
उपटी
खरीप/उन्हाळी
१०५-११० ११५-१२०
१२-१५ १५-२०
संपूर्ण महाराष्ट्रासाठी
२
जे.एल- २४ (फुलेप्रगती)
उपटी
खरीप
९०-९५
१८-२०
संपूर्ण महाराष्ट्रासाठी
३
टी.अे.जी – २४
उपटी
खरी...



