सोयाबीनवर उंटअळी व तंबाखुवरील पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव
एकात्मिक व्यवस्थापन करण्याचा वनामकृवितील कृषि कीटकशास्त्र विभागाचा सल्ला
सध्या स्थितीत सोयाबीन या पिकावर उंटअळया व तंबाखुवरील पाने खाणारी अळयाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन पाने खाणाऱ्या अळयांमुळे एकत्रितपणे (स्पोडोप्टेरा, उंटअळया, घाटेअळया, केसाळ अळया इ.) ७१ टक्के, फक्त उंटअळयामुळे ५० टक्के पर्यंत सोयाबीनचे नुकसान होऊ शकते. शेतकरी बांधवानी या कीडच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थपनाचा अवलंब करावा असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकश्यास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आला असुन पुढील प्रमाणे उपाय योजना सुचविल्या आहेत.
तंबाखुवरील पाने खाणारी अळी / स्पोडोप्टेरा - या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते आक्टोबर महिन्यात मोठया प्रमाणावर दिसून येतो. दिवसाच्या वेळी अनेकदा या अळया पानाखाली अथवा जमिनीत लपून राहतात व रात्रीच्या वेळी बाहेर पडतात ज्यामुळे त्या दि...


