Monday, December 1

शेती तंत्र

गोसंवर्धनामुळे शेती बनली समृद्ध!
शेती तंत्र

गोसंवर्धनामुळे शेती बनली समृद्ध!

आज-काल रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटत आहे. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील आढीव (ता. पंढरपूर) येथील भारत रानरूई यांनी देशी गायींचे संवर्धन करून आपली शेती समृद्ध बनविली. जुन्या रूढी व परंपरेतील विज्ञान शोधून त्याचा शेतीत केलेला वापर त्यांना फायदेशीर ठरला असल्याचे ते सांगतात. (more…)...
स्वस्त तण नियंत्रणासाठी कागदाचे मल्चिंग; नाविन्यपूर्ण प्रयोग नक्की वाचा
शेती तंत्र

स्वस्त तण नियंत्रणासाठी कागदाचे मल्चिंग; नाविन्यपूर्ण प्रयोग नक्की वाचा

गोवर्धन, नाशिक येथील ‘निर्मल ग्राम निर्माण केंद्र’ ही संस्था ‘सफाई’या विषयावर प्रयोग, प्रशिक्षण प्रचार, प्रसार, या माध्यमांतून काम करते. कचर्‍याचा आणि सांडपाण्याचा पुनर्वापर, खत निर्माण करणारी कमी खर्चातील संडासची मॉडेल्स, गांडूळ खत आणि सेंद्रिय खत बनविणारी विविध मॉडेल्स यांसारख्या शेती आणि पर्यावरणपूरक विषयांवर संस्थेचे संशोधन आणि प्रशिक्षण सुरू असते. संस्थेच्या जागेत थोड्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीने शेतीही केली जाते. यंदाच्या खरिपात संस्थेच्या संचालिका श्रीमती नलिनीताई नावरेकर यांनी वर्तमानपत्राच्या कागदाच्या मल्चिंगचा प्रयोग केला. त्यामुळे तण नियंत्रणाचे काम सोपे झाले. ‘आधुनिक किसान’च्या वाचकांसाठी त्यांच्याच शब्दांत हा प्रयोग देत आहोत. मजूर टंचाईच्या समस्येवर हा स्वस्त आणि सोपा प्रयोग मार्गदर्शक ठरू शकतो. (more…)...
  जनावरांमध्ये लाळया खुरकृतचा प्रादुर्भाव; असा आहे उपाय
शेती तंत्र

  जनावरांमध्ये लाळया खुरकृतचा प्रादुर्भाव; असा आहे उपाय

पाळीव जनावरे निरनिराळया रोगांनी आजारी पडतात. आजारी जनावराला प्रत्येक वेळी ताबडतोब पशुवैद्यकाची मदत मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत पशुपालकास जनावरांना होणारे सर्व सामान्य रोग व त्यावरील प्राथमिक उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाय माहिती असल्यास जनावरातील मृत्युचे तसेच अनुउत्पादकाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. जनावरांत सर्व साधारणपणे आढळणारे रोग खालील प्रमाणे आहेत. (१) हगवण : हगवणीचे प्रमाण नवजात वासरात जास्त आढळते. विशेषत: म्हशीच्या वासरामध्ये हगवणीमुळे होणा-या मृत्युचे प्रमाण जास्त आढळुन आले आहे. ज्या वासरांना जन्मानंतर एका तासाच्या आत चिकाचे दुध मिळत नाही, अशी वासरे हगवणीमुळे दगावण्याची शक्यता जास्त असते,  हा रोग जिवाणुमूळे होतो. कुजलेले अन्न खाणे, घाणेरडे पाणी पिणे किंवा हिरवा चारा प्रमाणाबाहेर खाणे यामुळेही रोग होण्यास चालना मिळते. या रोगाने आजारी असलेले वासरु करडी, पांढरी संडास करते. दुध...
कापुस पिकात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि उपाय
शेती तंत्र

कापुस पिकात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि उपाय

कापसातील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा....वनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला सद्यपरिस्थितीत कपाशी बोंड लागण्याच्या तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत असुन गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसुन येत आहे. गुलाबी बोंडअळी ही अतिशय नुकसानकारक कीड असुन ही बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरून या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, होणारे नुकसान टाळण्‍यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे. गुलाबी बोंडअळी अंडयातून निघुन ताबडतोब कळया, फुले व बोंडाना छोटे छिद्र करून आत शिरते. सुरूवातीला अळया पाते, कळया, फुलांवर उपजीवीका करतात. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमलेलल्या कळीसारखी दिसतात, अशा कळयांना डोमकळया म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्क न हो...
पीक उत्पादन वाढवायचे?  मग मधमाशा करतील मदत
शेती तंत्र

पीक उत्पादन वाढवायचे? मग मधमाशा करतील मदत

कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी नैसर्गिक परागीभवन करणाऱ्या सजीवांचे संरक्षण, मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही गोष्टींचे काटेकोर व्यवस्थापन करणेही गरजेचे राहील. मधमाश्‍यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळेच आज आपण पृथ्वीतलावरील विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचे हिरवेपण अनुभवू शकतो. एकूण पिकांपैकी पाच टक्के पिकांमध्ये स्वपरागीभवन घडून येते. तर ८५ टक्के पिकांत परपरागीभवन दिसून येते. मेक ग्रेगोर नामक प्रसिद्ध परागीभवनतज्ज्ञाच्या मते मनुष्याच्या आहारातील एक-तृतीयांश भाग सरळ किंवा अनपेक्षितपणे मधमाशी व अन्य कीटकांद्वारे परागीभवन झालेल्या पिकांद्वारे मिळतो. जगात मधमाशी व अन्य कीटकांद्वारे होणाऱ्या परागीभवनाचे आर्थिक मूल्य वार्षिक ६० ते ७० अब्ज अमेरिकी डॉलर आहे. आपल्या देशातही सुमारे सात टक्के पिकांमध्ये कीटकांद्वारे परागीभवन होते. आपला कृ...
वासरांचे संगोपन असे करा
शेती तंत्र

वासरांचे संगोपन असे करा

हरित क्रांती बरोबरच धवल क्रांतीदेखील तितकीच आवश्यक आहे. आपल्या देशात पशुधनाची संख्या भरपूर आहे, तरीपण दुघ्धोत्पादन म्हणावे तसे भेटत नाही. आपण वासराचे संगोपन लहानपणापासूनच व्यवस्थित केल्यास याच कालवडी उद्याच्या गाई होऊन दुधाचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत करतील. • वासराचा जन्म झाल्यानंतरचे व्यवस्थापन : वासरू जन्मल्यानंतर लगेचच त्याच्या नाकातोंडामधील चिकट पदार्थ काढून टाकावा. चारी खुरे साफ करून घ्यावीत. लगेच वासरास गाईच्या समोर ठेवावे. गाय आपल्या वासराला चाटून साफ करते, त्यामुळे वासराची कातडी कोरडी आणि साफ होते. तसेच त्याचा श्‍वासोच्छ्वास सुधारतो आणि पूर्ण शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू होते. हवा थंड असताना किंवा गाईने वासराला न चाटल्यास कोरड्या कापडाने वासराचे अंग पुसावे. त्याच्या शरीरापासून साधारण २ ते ५ सें.मी. अंतरावर नाळ बांधा आणि लिगेचरच्या खाली १ सेंमीवर तोडावे. तेथे टिंक्चर आयोडि...