Monday, December 1

बातम्या

दरमहा पगाराप्रमाणे उत्पन्न मिळवून देते रेशीम शेती
बातम्या

दरमहा पगाराप्रमाणे उत्पन्न मिळवून देते रेशीम शेती

रेशीम उदयोग हा मोठया प्रमाणाव रोजगार उपलब्ध करुन देणारा उदयोग आहे. या उदयोगामुळे शेतक-यास दरमहा वेतनाप्रमाणे सहज व घरबसल्या उत्पन्न मिळु शकते. त्यांच्या घरातील वृध्द, अपंग व्यक्ती, स्त्रिया, मुले हे सुध्दा या उदयेागात हातभार लाऊ शकतात. महाराष्ट्र राज्य रेशीम उत्पादक अपारंपारिक राज्यामध्ये आघाडीवर आहे. 2007-08 पासुन तुती रेशीम कोष उत्पादनामध्ये महाराष्टाने जम्‍मु–काश्मिर या पारंपारिक रेशीम उत्पादक राज्याला मागे टाकले.  कर्नाटक, आंध्रपदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडु या राज्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. या उदयोगास असणा-या अनुकूल हवामानामुळे उदयेागाच्या प्रगतीला वाव असुन मागील पाच वर्षात राज्यात रेशीम किटक संगोपनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.  तुती लागवड हवामान : महाराष्ट्र राज्याचे कृषि विषयक हवामान तुती लागवडीसाठी योग्य आहे. तुती लागवड ही 750 ते 1000 मि.मी. पाऊस व समुद्रसपाटीपासुन 300 ते 9...
मुलीच्या लग्नाची काळजी आहे? या योजनेतून मिळवा लाभ
बातम्या

मुलीच्या लग्नाची काळजी आहे? या योजनेतून मिळवा लाभ

मुलीचे लग्न म्हणजे खर्च आलाच. पण आता काळजी करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या/ शेतमजुरांच्या मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभमंगल/ नोंदणीकृत विवाह योजनेसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. शुभ मंगल सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1960 व सार्वजनिक विश्वसस्त अधिनियम 1850 अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था करु शकतात. सामुहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे 2000 रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान शासनामार्फत देण्यात येईल. असे आहे स्वरूप- सामुहिक विवाहात सहभागी होणाऱ्या शेतकरी/ शेतमजूर यांच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये एवढे अनुदान वधुच्या वडिलांच्या नावाने, वडिल हयात नसल्यास वधुच्या आईच्या नावाने व आई-वडिल दोन्हीही हय...
यश मिळवायचे असेल तर नियोजन महत्त्वाचे
बातम्या

यश मिळवायचे असेल तर नियोजन महत्त्वाचे

नियोजन म्हणजे यशाची गुरुकिल्ली ! स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र .त्यावेऴी नरेंद्रची दुसऱ्या दिवशी परीक्षा असते. पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून वीणा वाजवत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो आणि म्हणतो, अरे नरेंद्रा, उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे. असे असूनही तू अभ्यास करण्याऐवजी इथे येऊन वीणा वाजवत बसलास. तू कसा पास होशील ? तेव्हा नरेंद्र म्हणाला , \" अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे . मी आज काय करतो याची नाही.\" हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला.सांगायचं तात्पर्य असं की कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहिजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही, त्यासाठी नियोजन हवेच. -असे करा नियोजन १. उद्या काय करायचे आहे याचे वेळापत्रक आजच बनवा आणि उद्या सकाळपासून उठ...
बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार
बातम्या

बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार

राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यानुसार बाजार समितीवर संचालक निवडून देण्यासाठी ज्या बहुउद्देशिय  सहकारी संस्था त्यांच्या सदस्यांना पीक कर्ज वितरीत करतात त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बाजार समितीवर नियुक्त करावयाच्या अशासकीय प्रशासकीय मंडळाची संख्या ७ पेक्षा जास्त सदस्यांचे असणार नाही. बाजार समितीच्या बाजार आवारात नियमनात नसलेल्या शेतमाल व अन्य उत्पादनाच्या खरेदी-विक्रीवर बाजार समितीला उपयोगिता शुल्क (User charges) घेण्याचा हक्क असेल. बाजार समितीवर देखरेख शुल्क वसुलीसाठी बाजार समितीवर शासनाचा कर्मचारी नियुक्त करण्याची तरतूद वगळण्यात येईल व देखरेख फी “५ पैसे”...
काय आहे जनावरांचा दुग्धज्वर (मिल्क फीवर)? कसे करतात उपचार ?
बातम्या

काय आहे जनावरांचा दुग्धज्वर (मिल्क फीवर)? कसे करतात उपचार ?

 आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फीवर असे नाव असले, तरी त्यामध्ये जनावराचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते व जनावरास ताप नसतो.  आहाराचे योग्य व्यवस्थापन करून व पशुतज्ज्ञांकडे योग्य  उपचार करून हा आजार टाळता येतो. दुग्धज्वर किंवा मिल्क फिवर हा आजार साधारणपणे जास्त दूध देणा-या गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो. जास्त दूध देणारी जनावरे त्यांच्या तिस-या ते पाचव्या वितामध्ये या आजारास बळी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. पहिल्या किंवा दुस-या वितामध्ये जनावरे कमी वयाची किंवा तरुण असतात. या वयामध्ये जनावराची चा-यातील क्षार शोषण्याची क्षमता तसेच हाडांमध्ये असलेले जास्त कॅल्शियमचे प्रमाण यांमुळे हा आजार होण्याचा धोका फार कमी असतो. हा आजार मुख्यत्वे संकरित गाई व म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. रक्तातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. मुख्यतः ही कमतरता ५ ते १o वर्षे वयाच्या गाई आणि म्हशींम...
अवघ्या 20 हजारात सुरु करा मशरूमचा जोडधंदा
बातम्या

अवघ्या 20 हजारात सुरु करा मशरूमचा जोडधंदा

व्यापारीदृष्घ्टया एक उदयोग म्हणुन अळींबीची लागवड १९ व्या शतकातच प्रचलित झाली आहे. सद्या दोन डझन विविध प्रकारच्या व्यापारी तत्वावर जगभर लागवड केली जाते. अळींबीचे महत्व अळींबी खाण्यास स्वादिष्ट तर असतेच त्याशिवाय तिच्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे व खनिजे विपुल प्रमाणात असतात. अळींबीमध्ये साधारणपणे ३.५ टक्के प्रथीने असतात. हे प्रमाण आपल्या नेहमीच्या भाज्यापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. या शिवाय या प्रथिनाची पाचकता ७० ते ९० टक्के इतकी असते.  अळींबीस एक विशिष्ट प्रकारचा स्वाद असतो. जीवनाश्यक अमिनो आम्ले व ब, क, ड ही जीवनसत्वे विपुल प्रमाणात असतात. अळीबीमध्ये लोह, कॅल्शीयम, पोटॅशियम आणि फॉस्फरस ही खनिजे मोठया प्रमाणात असतात. मधुमेह असणा-या व्यक्तीस कमी उर्जा व जास्त प्रथिनांचा आहार सुचविला जातो.  अळींबी हे कमी उर्जा व जास्त प्रथिने युक्त अन्न आहे. अळींबी कार्बोदकामध्ये स्टार्च व शर्करा नसतात, ज्या मधुम...